Dapoli : वराडकर महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरातून १९ बंधाऱ्यांची निर्मिती

दापोली : एन. के. वराडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरात करंजाणी येथे विद्यार्थ्यांनी जलसंधारणासाठी भरीव कामगिरी केली. फक्त दोन दिवसांत करंजाणी व उघडा मारूती परिसरात १९ बंधारे उभारून जलविकासाला चालना दिली.

शिबिरास कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी सहाय्यक श्रीकृष्ण गंगावणे यांनी भेट देत ‘राष्ट्र विकासातील युवकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले. या उपक्रमात सरपंच लहू साळवी, चेअरमन तानाजी कालेकर, उपसरपंच समीक्षा कालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अंतोष कालेकर, पोलीस पाटील मयूर विटले आर्दीचे सहकार्य लाभले. प्रकल्प अधिकारी डॉ. स्कंधा खेडेकर व प्रा. जनार्दन गिरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरातील सर्व उपक्रम पार पडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 05/Dec/2025