Sangameshwar : नारडुवे परिसरात दोन गव्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील नारडुवे परिसरात दोन गव्यांमध्ये झालेल्या झुंजीत मादी गव्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. सकाळी सातच्या सुमारास मृत गवा आढळल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

तेथे पाहणीदरम्यान मादी गव्याचा मागील उजवा पाय दुसऱ्या गव्याच्या शिंगात अडकून गंभीर जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. आसपासच्या जमिनीवरही झुंजीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर पशुधन विकास अधिकारी कडवई यांनी मृत गव्याचे विच्छेदन केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून लाकडाच्या सहाय्याने दहन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. घटनास्थळी विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, आकाश कडुकर, सूरज तेली, सुप्रिया काळे तसेच ग्रामस्थ संदेश जोगळे, अर्जुन जोगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 AM 06/Dec/2025