मेर्वीत हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

पावस : तालुक्यातील मेवीं येथील जंगलमय भागात दगडी बांधाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत २१० रुपयांची एक लिटर दारू जप्त केली. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

विजय दत्ताराम माईन (वय ४०, रा. बंडबेवाडी, कुर्धे, पो. मेर्वी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) सायंकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संजय शिवगण यांनी पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बेकादेशीर मद्य साठा, वाहतूक करणाऱ्यांवर येथून पुढेही अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 06/Dec/2025