रत्नागिरी येथील संस्कृत पाठशाळेत ३ जानेवारीपासून श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग

रत्नागिरी : श्रीमद्भगवद्गीता हा मानवी जीवनाचे सार सांगणारा आणि जीवनाला दिशा देणारा महान ग्रंथ आहे. आजच्या कलियुगात तर गीतेचा संदेश पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा आहे. रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे येत्या जानेवारी महिन्यापासून श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग सुरू केले जाणार आहेत. १२ ते ७० या वयोगटातील कोणीही या वर्गामध्ये येऊन गीता शिकू शकणार आहे. त्यामुळेच अधिकाधिक रत्नागिरीकरांनी या गीता शिकवणी वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे आणि उपाध्यक्षा प्रतिभा प्रभुदेसाई यांनी केले आहे.

श्रीमद्भगवद्गीता शिकवणी वर्ग दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत होणार आहेत. यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून गीतेचे सर्व म्हणजे १८ अध्याय शिकवले जाणार आहेत. या वर्गात येऊन गीता शिकू इच्छणाऱ्यांनी २० डिसेंबर २०२५ पूर्वी आपले नाव नोंदवून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे. हे शिकवणी वर्ग निःशुल्क आहेत. जास्तीत जास्त श्रीमद्भगवद्‌गीता प्रेमींना या संधीचा लाभ घ्यावा व शिकवणी वर्गाद्वारे श्रीमद्भगवद्‌गीता समजून घ्यावे असे आवाहन गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 06/Dec/2025