पावस : पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणपत रामंचद्र पानगले (वय ५६, रा. धोपटवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३) दुपारी १च्या सुमारास पावस-पानगलेवाडी गौतमी नदीकिनारी झाडाखाली निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत लोहळकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 06/Dec/2025












