Lanja : खावडी हायस्कूलमध्ये आजपासून ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लांजा : तालुक्यातील खावडी श्री सरस्वती विद्या निकेतन माध्यमिक शाळा आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन ८ ते १० डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्घाटन प्रसंगी सह्याद्री श्रमिक शिक्षण संस्था मुंबई (खावडी) चे अध्यक्ष उमेश कानडे, उपाध्यक्ष डी डी देसाई, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य. व प्राथ.) किरण लोहार, लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, पंचायत समिती गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, जिल्हा उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) सुनिता शिरभाते, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) प्रदीप पाटील, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) सूर्यवंशी, एमकेसीएल जिल्हा समन्वयक संतोष कोलते, खावडीच्या सरपंच मृणाली आंब्रस्कर, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी चंद्रकांत पावसकर, विस्तार अधिकारी विमल चव्हाण, मुख्याध्यापिका दामिनी भिंगार्डे, केंद्रप्रमुख भिकाजी रावले उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये ८ रोजी सकाळी १०.३० वा. विज्ञान दिंडी, दुपारी १२ वा. नोंदणी व प्रतिकृती मांडणी, तर ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. उद्घाटन समारंभ, दुपारी २ वा. प्रश्नमंजुषा, प्रतिकृती परीक्षण व खुले प्रदर्शन, १० रोजी सकाळी १० वा. प्रतिकृती परीक्षण व खुले प्रदर्शन, दुपारी १ वा. पारितोषिक वितरण होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 08/Dec/2025