Ratnagiri : एसएसबी परीक्षा पूर्वतयारीसाठी मुलाखत ९ डिसेंबर रोजी

रत्नागिरी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सव्र्व्हस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी नाशिक रोड नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६४ अंतर्गत पूर्वतयारी आयोजित करण्यात येत आहे.

तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारीपदाची संधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर पुणे (डीएसडब्लू) वेबसाईटवर सर्च करुन एसएसबी – ६४ कोर्ससाठी प्रवेशपत्र घेऊन यावे, असे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 08/Dec/2025