राजापूर पश्चिम भागात विद्रूप स्थितीत आढळला बिबट्याचा मृतदेह

राजापूर : बिबट्याचा राजापूर तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती असलेली पोस्ट त्या गावातील अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. मृतदेहाचे विद्रूप स्वरूप, नदीपात्रात वाहत असल्याचे वर्णन आणि शरीराचे अवयव कापून नेल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी शनिवारी सायंकाळी उशिरा घटनास्थळाकडे रवाना झाले होते. त्यांनी मृतदेह आढळलेल्या बिबट्याची नखे तसेच पंजे शाबूत असल्याचे सांगितले.

काही नागरिकांना हे संपूर्ण प्रकरण शंकास्पद वाटत असून, “जर घटना खरी असेल तर वनविभाग गप्प का”, असा सरळ सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अधिकृत माहिती नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर संभ्रमित आहेत. सोशल मीडियावरून येणाऱ्या पोस्टमुळे भीती आणि तणाव वाढत असून वनविभागाने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दोन दिवस त्याबबतची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत असतानाच शनिवारी सायंकाळी उशीरा वनविभागाचे अधिकारी घटना स्थळाकडे रवाना झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:06 PM 08/Dec/2025