लांजा : रस्त्याचा भाग खचल्याने बांधकाम क्राँकीट करणारा मिक्सर पऱ्यात कोसळून चालक जागीच ठार झाल्याची घटना लांजा तालुक्यातील वेरळ लक्ष्मीकांत मंदिरनजीक शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. पावडाप्पा चंद्राम मादर (वय २१, रा. डोनूर, ता. बसून बागेवाडी, जि. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. नाचणे, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. वेरळ गावातील लक्ष्मीकांत मंदिराच्या पाखाडीचे काम सुरू असून या ठिकणी पावडाप्पा मादर हा लक्ष्मीकांत मंदिराकडे आलेल्या कच्च्या रस्त्याने मिक्सर घेऊन जात होता. यावेळी मिक्सर मशिनमध्ये क्राँक्रीट भरलेले होते मिक्सर घेऊन जात असताना लक्ष्मीकांत मंदिरनजीक रस्त्याचा उजव्या बाजुचा भाग खचल्यामुळे मिक्सर मशीन चालकासह रस्त्यालगत असणाऱ्या लक्ष्मीकांत पऱ्यामध्ये कोसळला.
मिक्सरच्या खाली चालक पावडप्पा हा अडकून पडला होता. त्याला लांजा ग्रामीण रुग्णलयात उपचाराकरिता दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषीत केले. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:13 PM 08/Dec/2025












