Ratnagiri : थिबा पॅलेस रस्त्यावर कारच्या धडकेत वृद्धा जखमी

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रस्त्यावर कारची धडक बसून वृद्धा जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून अपघाताची ही घटना ६ डिसेंबर रोजी दु १.३० वा. सुमारास घडली.

राजश्री चंद्रकांत जाधव (६४, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. शनिवारी दुपारी राजश्री जाधव या थिबा पॅलेस रोडने चालत जात होत्या. त्या चंद्रशेखर डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यासमोर आल्या असता पाठीमागून येणाऱ्या कार (एमएच-१४-बीएक्स-३६४२) वरील महिलेने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आपल्या ताब्यातील कार हयगईने चालवून हा अपघात केला. यात राजश्री या जाधव यांच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. अपघाताची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:28 PM 08/Dec/2025