Lanja : खेरवसे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन

लांजा : आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून तालुक्यातील खेरवसे गावच्या रस्ता डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खेरवसे येथे पार पडला. आमदार सामंत यांच्या माध्यमातून खेरवसे गावाला रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. खेरवसे गावात जाणारा मुख्य रस्ता लाल-जांभ्या दगडाचा असून, अनेक वर्षे हा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. याआधी गावातील नागरिकांनी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाकडे रस्ता डांबरीकरणासाठी अनेकवेळा मागणी केली होती. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे गावच्या रस्त्याची समस्या मांडली होती. त्यानुसार आमदार सामंत यांनी नागरिकांना रस्ता डांबरीकरण होईल असे आश्वासन दिले होते.

अखेर त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार खेरवसे गावच्या रस्त्याला लेखाशीर्ष गट-व कार्यक्रम २०२४-२५ या योजनेतून डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. सरपंच रुपाली लोटणकर, शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई व गावचे मानकरी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवासेना तालुका प्रमुख राजू धावणे, तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुका संघटक चेतन खांदारे, बेनी खुर्द-खेरवसेचे माजी सरपंच किरण गुरव, माजी सरपंच मोनिका साळुंखे, खेरवसेच्या पोलीस पाटील रुपाली कांबळे, रामचंद्र महाडिक, दिलीप गुरव, राजेंद्र खानविलकर, विजय धनावडे, विलास गुरव, रमेश गुरव, मोहन धनावडे, महेंद्र कळबटे, नितीन महाडिक, राजेंद्र लोटणकर, राजू सावंत, प्रभाकर गुरव आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 09/Dec/2025