चिपळूण : ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मिलिंद साठे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाव ठरली आहे. विद्यमान महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने साठे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. साठे हे चिपळूण तालुक्यातील मालघर येथील आहेत. कै. रामभाऊ साठे यांचे ते सुपुत्र आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या नागपूर येथे झालेल्या बैठकीत सर्व सदस्यांचे एकमत होत साठे यांच्या नियुक्तीचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. हिवाळी अधिवेशन पूर्वसंध्येला निर्णय झाला. चिपळूणचे रहिवासी असलेले मिलिंद साठे मिलिंद साठे हे विधी क्षेत्रात अनुभवी आणि नावाजलेले आहेत. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून काम केले असून, विविध महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला मोठा लाभ होईल, असा विश्वास मंत्रिमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 09/Dec/2025












