रत्नागिरीच्या दिव्या पाल्ये हिची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

रत्नागिरी : कर्नाटक बंगलोर येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रत्नागिरीच्या दिव्या पाल्ये हिची निवड झाली आहे. येत्या 31 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत बंगळुरू, कर्नाटक येथे होणाऱ्या 44व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत दिव्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही निवड अहिल्यानगर येथे पार पडलेल्या 51 वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धे करण्यात आली आहे. निवड समिती सदस्य श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोळसे (बीड) व राखी जोशी (पुणे) यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या संघाची घोषणा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केली.

दिव्या पाल्ये हिने यापूर्वी गया येथे शासनाच्या खेलो इंडिया स्पर्धेमध्येही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तिला राष्ट्रीय प्रशिक्षिक पंकज चवंडे व रा. भा. शिर्के हायस्कूलचे शिक्षक विनोद मयेकर यांनी मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल आर. ए. सोसायटीच्या शिल्पाताई पटवर्धन, सतिश शेवडे यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 10/Dec/2025

Pednekar sankul