कळंबणी येथे मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करणाऱ्याविरोधात गुन्हा

खेड : उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करणाऱ्याविरोधात खेड पोलिसांनी दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.५१ वाजता घडली. पोलिस शिपाई रमेश तुकाराम बांगर यांच्या फिर्यादीवरून, मनोहर भागोजी कदम (वय ४७, रा. तिसे मोहानेवाडी, ता. खेड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५ (१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित हा सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. शांतता भंग करणारे वर्तन केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:19 PM 10/Dec/2025