देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मंडळ अधिकारी सागर अनंत करंबेळे (४२, रा. देवरुख) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारास संशयित क्रमांक १ सुरज उदय नलावडे (रा. करजुवे) याने कापशी नदीतून बेकायदेशीररीत्या सुमारे २५ ब्रास, किंमत अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची वाळू उपसून ठेवली होती. त्यानंतर संशयित क्रमांक २ शकील अहमद (२४, रा. उत्तर प्रदेश) व संशयित क्रमांक ३ राजकुमार प्रजापती (रा. चिपळूण) हे दोघेही घटनास्थळी येऊन एकमेकांच्या संगनमताने वाळूचे लोडिंग व वाहतूक करत असल्याचे पोलिसांना आढळले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३२ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये २५ ब्रास वाळू याची २, लाख ५० हजार रु., जेसीबी (०९//०५०७) २० लाख रु. डंपर (०८//८७२४) १० लाख रु असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबअल के. आर. सावंत यांनी केली. पुढील तपास पोलिस उप निरिक्षक व्ही. डी. साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
संगमेश्वर तालुक्यात वाढत्या अवैध वाळू उत्खननाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 10/Dec/2025













