चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्था संचलित खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चिंचघरी सरपंच अनिता गुरव यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावला तर उपसरपंच दीक्षिता चाळके यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित केली. शालेय समिती सदस्य राजाभाऊ चाळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ लहान व मोठा गट मुले, मुली कबड्डी स्पर्धा झाली. स्पर्धेत मोठा गटात मुलांमध्ये दहावी ब विजयी, व नववी फ उपविजयी, लहान गटात मुलांमध्ये सातवी ड विजयी, सातवी ब उपविजयी, लहान गट मुलींमध्ये सातवी ब विजयी, सातवी ड उपविजयी, मोठा गट मुलींमध्ये नववी अ विजयी, आठवी इ/फ उपविजयी संघ झाले.
संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापक संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक महेश सावंत यांनी केले. या वेळी उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 10/Dec/2025













