Khed : ऐनवरेत हिशोबाच्या कारणावरून एकास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

खेड : तालुक्यातील ऐनवरे येथे हिशोबाच्या कारणावरून सार्वजनिक रस्त्यात अडवत मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनिल बाबुराव जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

सुहास बाबाजी जाधव, प्रसन्न पांडुरंग जाधव, सुभाष गणपत जाधव, राजेश रामचंद्र जाधव (सर्व रा. ऐनवरे-खालचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चौघांनी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या पाठीमागील सार्वजनिक रस्त्यावर अडवत शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 11/Dec/2025