राजापूर : श्री आर्यादुर्गा व श्री नवदुर्गा देवी यांची भेट म्हणजेच श्री आर्यादुर्गा देवी जत्रोत्सव ११ व १२ डिसेंबर रोजी श्री आर्यादुर्गा मंदिर श्री क्षेत्र देवीहसोळ येथे साजरा होत आहे. ११ रोजी सकाळी १० वाजता आर्यादुर्गा मंदिर सभागृह उद्घाटन रणजित पुराणिक यांच्याहस्ते, तर रात्री ९ वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज मनोरंजन कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी या जागृत देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा व जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था देवीहसोळ मुंबईचे अध्यक्ष रमेश विचारे, सेक्रेटरी अविनाश भोवड, खजिनदार दिनेश विचारे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 11/Dec/2025












