1 लाखांहून अधिक रकमेची रोख बक्षिसे
रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथे सलग तिसऱ्या वर्षी ‘ भंडारी प्रीमियर लीग ‘ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालगुंड येथील कै. नाना साहेब मयेकर क्रीडांगणावर ही भव्यदिव्य स्पर्धा भरवण्यात येणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर लिलाव प्रक्रिया करून 16 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक आणि यजमान यांनी दिली. या स्पर्धेत एक लाखांहून अधिक रकमेच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे.
भंडारी समाजातील तरुणांना क्रिकेट खेळण्याची जास्त संधी मिळावी तसेच भंडारी समाजातील तरुण वर्ग या भंडारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून एकवटला जावा ही उद्दिष्ट नजरे समोर ठेऊन ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आली आहे. २८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
भंडारी प्रीमियर लीगसाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत विजेत्या संघाला ५१ हजार रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला ३1 हजार रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २1 हजार रोख व चषक, चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ११ हजार रोख व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूला देखील गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी निखिल बोरकर 9422750907, चेतन बोरकर 7743826266, प्रल्हाद हळदणकर 9892645791 आणि पंकज नार्वेकर 8668699844 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 11/Dec/2025












