रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा डॉजबॉल संघ 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जालना येथे होणाऱ्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी जोशात व उत्साहात रवाना झाला आहे. विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर मजल मारलेल्या या संघामुळे शाळेत आनंद आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल दृढ केले. प्राध्यापक प्राजक्ता कुलकर्णी, वर्षा जोशी आणि वृंदाली गुरव यांनीही खेळाडूंना शुभेच्छा देत उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.
डॉजबॉल मार्गदर्शक शिक्षक श्री दत्ता मांजरेकर व श्रीपाद गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यवाह श्री. धनेश रायकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर तसेच पर्यवेक्षक लवंदे सर आणि शिरोळकर मॅडम यांनीही संघाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. डॉजबॉल खेळातील निष्ठा, सरावाची शिस्त आणि संघातील एकजूट यांच्या जोरावर हा संघ राज्यस्तरावरही चमकदार यश संपादन करेल, असा विश्वास सर्वानी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 11/Dec/2025












