नागपुरात रत्नागिरी भाजपची ‘पॉवर’फुल भेट! दादा ढेकणेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी चर्चा

नागपूर : रत्नागिरी शहराच्या विकासात्मक प्रश्नांवर आणि संघटनात्मक बांधणीसाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची ‘रामगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण (Ravindra Chavan) यांचेही विशेष मार्गदर्शन आणि सदिच्छा लाभल्याने रत्नागिरी भाजपमध्ये (Ratnagiri BJP) नवचैतन्य निर्माण झाले आहे.

रत्नागिरीच्या विकासावर ‘रामगिरी’त खलबते

या भेटीत रत्नागिरी शहरात भाजप संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहर संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, रत्नागिरीतील जनतेसाठी सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, आगामी काळातील नियोजनाबाबत राज्य नेतृत्वाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संघटना अधिक बळकट आणि विस्तारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

या पदाधिकाऱ्यांचा होता समावेश भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळात पुढील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता : संदीप प्रभाकर सुर्वे (शहर सरचिटणीस), मंदार दिलीप भोळे (कामगार मोर्चा शहराध्यक्ष), मनोर श्रीकृष्ण दळी, संतोष बळवंत सावंत, प्रसाद विजय बाष्ठे, प्रविण प्रभाकर ढेकणे, सिद्धेश दत्ताराम नाईक, विजय आनंद माळवदे

संघटनेला मिळाली नवी ऊर्जा : दादा ढेकणे

या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना शहराध्यक्ष दादा ढेकणे म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांशी झालेली ही भेट रत्नागिरी शहर संघटनेसाठी ‘बूस्टर डोस’ ठरली आहे. नेतृत्वाने दिलेले मार्गदर्शन आणि आशीर्वाद यामुळे आम्हाला नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली असून, आगामी काळात रत्नागिरीत अधिक वेगाने विकास आणि संघटनवृद्धी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:49 PM 11/Dec/2025