खेड : खेडहून भरणेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहन आडवे उभे करून वाहतूक कोंडी निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी २. ३४ वाजता घडली. याप्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन बळवंत किर्वे (वय ४७, रा. गोपाळ पंताची वाडी, करेडी, ता. जावळी, जि. सातारा) याने आपल्या ताब्यातील एमएच ११ बीव्ही ४९७८ क्रमांकाची गाडी रस्त्यात उभी केली होती.
यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. तसेच पादचाऱ्यांच्या जीविताला धोका उत्पन्न झाला. घटना लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिस कर्मचारी अस्मिता अमित साळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.४७ वाजता करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 12/Dec/2025












