Chiplun Walawalkar Hospital : वालावलकर रुग्णालयात मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी; ७५ रुग्णांनी घेतला लाभ

चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात सेरेब्रल अँजिओग्राफी व स्ट्रोक व्यवस्थापन शिविर व कार्यशाळा झाली. योळी मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. याचा लाभ रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील ७५ रुग्णांनी घेतला.

मुंबई के.ई.एम. रुग्णालयातून न्युरोसर्जेरी विभागाचे प्रमुख डॉ. नितीन डांगे (संचालक व विभागप्रमुख, इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) आणि त्याचे सहकारी न्युरो सर्जन डॉ. मयूर घरत आणि डॉ. कुशल भाटिया (सल्लागार मेंदू आणि मणक्याचे इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजी व स्ट्रोक) यांनी वालावलकर रुग्णालयाला भेट देऊन कोकणातील गोरगरीब रुग्णांमध्ये जनजागृती करून ही अद्ययावत यंत्रणा त्यांना कशी पुरवता येईल यावर सर्व डॉक्टर्सना आणि जनरल प्रॅक्टिशनरना मार्गदर्शन केले.

रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, पोलादपूर, इंदापूर, माणगाव, महाड, दापोली, खेड, अलोरे इत्यादी गावातील रुग्णांनी लाभ घेतला. त्याशिवाय २५ रुग्णांना तपासून त्यातील २ रुग्णांवर मेंदूची अँजिओग्राफी केली. यासाठी वालावलकर रुग्णालयातील डिजिटल सबट्रॅक्शन लॅब या अद्ययावत सुविधेचा वापर करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 12/Dec/2025