रत्नागिरी सिटी ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत आर्यन वेल्हाळ, नेहा मुळ्ये विजेत्या

रत्नागिरी : रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनने ९ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात आर्यन वेल्हाळ आणि नेहा मुळ्ये यांनी विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेते असे – १७ वर्षांखालील मुलीः नेहा मुळ्ये, १७ वर्षांखालील मुले आर्यन वेल्हाळ, १५ वर्षांखालील मुलीः रिया पेढामकर, १५ वर्षांखालील मुलेः समर्थ पवार, १३ वर्षांखालील मुलीः विश्वा गमरे, १३ वर्षांखालील मुलेः समर्थ पवार, ११ वर्षांखालील मुलीः वल्लरी देवस्थळी, ११ वर्षांखालील मुलेः अभिराज पवार, ९ वर्षांखालील मुलीः शार्वी साळुंखे, ९ वर्षांखालील मुलेः अभिराज पवार.
बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी सिटी बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी भूषवले. या प्रसंगी अमित मुळ्ये, सुधीर बाष्टे, सरोज सावंत व सीताराम सावंत उपस्थित होते. सूत्रसंचालन रत्नागिरी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रजनीश महागावकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात आंबुलकर यांनी स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व खेळाडू, पालक व बॅडमिंटन प्रशिक्षकांचे आभार मानले. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करून होतकरू खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:49 PM 24/Dec/2025

Samarth gold