धार्मिक स्थळांवर स्पिकर लावण्यास एक वर्षाची परवानगी; आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश

आरवली : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी मशीद, मंदिर धार्मिक स्थळावर लाऊड स्पिकर लावण्यासाठी एक वर्षाची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली होती. ही मागणी निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मार्गी लावली असून आता एक वर्षाच्या कालावधीसाठी मशीद, मंदिर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी मिळाली आहे.

अल्पसंख्याक सेलच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आमदार निकम यांच्या उपस्थितीत सावर्डे येथे झाली होती. यावेळी मशीद, मंदिरांवर लाऊड स्पिकर लावण्यासाठी एक वर्षासाठी परवानगी देण्याची मागणी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी केली होती. निकम यांनी याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे खासदार सुनील तटकरे यांच्यातर्फे पाठपुरावा केला. आता ही मागणी पूर्ण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 25/Dec/2025

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!