रत्नागिरी : शहरातील माळनाका येथे दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात निवृत्त शिक्षक दत्तप्रसाद वासुदेव गोडसे (वय ७७, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष वासुदेव सोनार (४०, रा. सनगरेवाडी, कोतवडे, रत्नागिरी) असे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत दत्तप्रसाद गोडसे यांचा मुलगा यशोधन दत्तप्रसाद गोडसे (५०, रा. सन्मित्रनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
रविवारी सकाळी ८.१० वा. सुमारास त्यांचे वडील माळनाका येथील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी जात होते. त्याचवेळी संतोष सोनार हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एयू-२६१५) घेऊन एसटी स्टैंड ते मारुती मंदिर असा भरधाव वेगाने जात होता. तो माळनाका येथील गांधी पेट्रोल पंपासमोर आला असता, रस्ता ओलांडणाऱ्या दत्तप्रसाद गोडसे यांना त्याच्या दुचाकी धडक बसली. यात दत्तप्रसाद गोडसे हे रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या नाका तोंडातून रक्त येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 28/Oct/2024