Mayor Reservation : राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिलाराज! जाणून घ्या संपूर्ण यादी

मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौरपदाचं आरक्षण काढलं जात आहे. राज्यातील 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नवी मुंबईसह 9 महापालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालं.

29 पैकी पंधरा महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव आहे. त्या 15 पैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला दोन महापालिकांमध्ये महापौर असतील. अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी लातूर आणि जालना या महापालिकांसाठी महापौरपदाचं आरक्षण पडलं आहे.

राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे महापौर होणार आहेत. त्यापैकी चार महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असतील. अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि जळगाव येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांना महापौर होता येणार आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर 17 महापालिकांमध्ये विराजमान होतील. त्यापैकी 9 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे.मालेगाव, पुणे, धुळे, मुंबई , नांदेड-वाघाळा,नवी मुंबई, नागपूर, मिरा भाईंदर नाशिक महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौरपदावर विराजमान होईल.

Aayurzil

अनसुचित जाती प्रवर्ग महिला आरक्षण

जालना, लातूर

ओबीसी महिला

अहिल्यानगर, अकोला, जळगाव, चंद्रपूर

सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण

पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव, मिरा भाईंदर, नागपूर, नाशिक

29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण

छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण
नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)
वसई- विरार: सर्वसाधारण
कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती
कोल्हापूर: ओबीसी
नागपूर: सर्वसाधारण (महिला)
बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)
सोलापूर: सर्वसाधारण
अमरावती: सर्वसाधारण
अकोला: ओबीसी (महिला)
नाशिक: सर्वसाधारण (महिला)
पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
पुणे: सर्वसाधारण (महिला)
उल्हासनगर: ओबीसी
ठाणे: अनुसूचित जाती
चंद्रपूर: ओबीसी (महिला)
परभणी: सर्वसाधारण
लातूर: अनुसूचित जाती (महिला )
भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
मालेगाव: सर्वसाधारण (महिला)
पनवेल: ओबीसी
मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)
नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)
सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
जळगाव: ओबीसी (महिला)
अहिल्यानगर: ओबीसी (महिला)
धुळे: सर्वसाधारण (महिला)
जालना: अनसूचित जाती (महिला)
इचलकरंजी: ओबीसी

महापौर आरक्षणावर आक्षेप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतील गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला. ओबीसी आरक्षणासाठी मुंबई महापालिकेची चिठ्ठी का टाकली नाही, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. तर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी किशोरी पेडणेकर यांनी घेतलेले आक्षेप फेटाळले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 22-01-2026