खेड : भरणे – खेड मार्गावर सोमवार, २३ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास भरणे येथून खेडच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीसमोर अचानक भटके जनावर आल्याने दुचाकी त्यावर धडकून उलटली. यावेळी दुचाकीवरस्वार वृद्ध जखमी झाला. सोमवारी एक्सेस स्कूटी (एम एच ०४ इ एन ४८५७) जात होती. भरणे होंडा शोरूमसमोर उनाड जनावर अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकी त्यावर धडकली व उलटली. या अपघात दुचाकीवर स्वार कृष्णा चव्हाण (७०, रा. किवली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना भरणे नाका पुलाखाली उभी असणारी श्री जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीजधामच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 24/Sep/2024