Silver Rate : चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर

सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. जानेवारी महिन्यात 4 लाखांच्या पार गेलेल्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात 5357 रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीच्या दरामध्ये एमसीएक्सवर ज्या प्रमाणे घसरण झाली त्याच प्रमाणे सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 1780 रुपयांची घसरण झाली आहे. सोने उच्चांकावरुन 50 हजारांनी स्वस्त झालं आहे.

जानेवारी महिन्यात चांदीच्या दरानं 4 लाख 39 हजारांचा उच्चांक गाठला होता. एक किलोचा दर 439337 रुपये होता. त्यानंतर चांदीच्या दरात 1 लाख 87 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर 5 मेच्या एक्सपायरीच्या वायद्याचे चांदीचे दर शुक्रवारी 2 लाख 57 हजार 142 रुपये किलोवर होते. त्यात आज 5357 रुपयांची घसरण झाली असून चांदीचा एक किलोचा दर 251785 रुपयांवर आले आहेत.

Amey jwelrs

गेल्या आठवड्यात चांदीचे दर 14805 रुपयांनी वाढले होते. तर, सोन्याचे दर मागील आठवड्यात 1953 रुपयांनी वाढले होते. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 21-04-2026