रत्नागिरीत १६ नोव्हेंबरपासून राज्य नाट्य स्पर्धेचा थरार रंगणार; ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

रत्नागिरीत १६ नोव्हेंबरपासून राज्य नाट्य स्पर्धेचा थरार रंगणार; ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

​स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार प्राथमिक फेरी; जिल्ह्यातील नाट्यप्रेमींसाठी १८ दर्जेदार नाटकांची पर्वणी

रत्नागिरी :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या बहुचर्चित ‘६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७’ च्या प्राथमिक फेरीचे केंद्र यंदा रत्नागिरी ठरले आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीत ही नाट्यस्पर्धा रंगणार असून, त्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता ही नाटके सादर होणार असून नाट्यप्रेमींसाठी तिकीट दर अवघे १५ रुपये आणि १० रुपये ठेवण्यात आले आहेत.
सादर होणाऱ्या नाटकांचे सविस्तर वेळापत्रक (वेळ : दररोज सायं. ७ वा.) :
सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ : मेला तो शेवटचा होता (लेखक: विजय खानविलकर, दिग्दर्शक: दशरथ रांगणकर – स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, कोळंबे, रत्नागिरी)
मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ : व्हायरल आजोबा (लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: लक्ष्मीकांत भाटकर – सुमती थिएटर्स, रत्नागिरी)
गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ : लाईफलाईन (लेखक: अनिल काकडे, दिग्दर्शक: ओंकार पंडित – श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, पावसट)
शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ : पितामह उवाच (लेखक: मिलिंद दातार, दिग्दर्शक: गणेश जोशी – श्री देव सोमेश्वर संयुक्त आणि ॲग्रोव्हमेंट ट्रस्ट)
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ : प्रिय आईस (लेखक: वसंत कानेटकर, दिग्दर्शक: प्रज्ज्वला बागूल – सन्मान प्रतिष्ठान)
रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ : ब्लेम ट्रॅप अँड गेम (लेखक व दिग्दर्शक: राजेश गोसावी – शिवस्वराज्य फाऊंडेशन, लांजा)
सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ : ॲन एनीमी ऑफ द पिपल (लेखक: तन्मय राऊत, दिग्दर्शक: गणेश राऊत – स्टार थिएटर, रत्नागिरी)
बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ : वॉरंट (लेखक: गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक: चंद्रकांत कांबळे – संकल्प कलामंच, रत्नागिरी)
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ : चांदणी (लेखक: रोहित पगारे, दिग्दर्शक: अजिंक्य केसरकर – सहयोग, रत्नागिरी)
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ : स्मृतिगंध (लेखक: अमोल मांडवकर, दिग्दर्शक: अनिल मांजरेकर – ओंकार मित्र मंडळ सामाजिक संस्था, काताळेवाडी, खारे)
शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ : स्वप्रपंख (लेखक: दिनेश कवडे, दिग्दर्शक: सुयोग बेंडल – ओम साई गणेश प्रतिष्ठान, मिरजोळे)
रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ : Exception 375 (लेखक व दिग्दर्शक: भूषण बागूल – नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ, पाली)
सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ : षडयंत्र (लेखक: सुरेश जयराम, दिग्दर्शक: शेखर मुख्ये – मधू मिलिंद प्रतिष्ठान, रत्नागिरी)
मंगळवार, १ डिसेंबर २०२६ : अंधारवाटा (लेखक व दिग्दर्शक: प्रवीण कांबळे – लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई-ग्रामीण)
बुधवार, २ डिसेंबर २०२६ : सूर राहू दे (लेखक: शंकर नवरे, दिग्दर्शक: जनार्दन पेडणेकर – कुसुमेश्वर क्रीडा मंडळ, कोतवडे)
शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ : दैवायत्तम कुले जन्म (लेखक: डॉ. समीर मोने, दिग्दर्शक: ओंकार पाटील – समर्थ रंगभूमी, रत्नागिरी)
शनिवार, ५ डिसेंबर २०२६ : दि ॲनॉनिमस (लेखक: अतुल साळवे, दिग्दर्शक: संदीप शेट्ये – खाल्वायन, रत्नागिरी)
रविवार, ६ डिसेंबर २०२६ : शेवंता जिती हाय (लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: निलेश सज्जन मुळे – कै. संभाजीराव महादेवराव भोसले फाउंडेशन संचलित ऐश्वर्या आर्ट अकॅडमी, पोफळी)
सोमवार, ७ डिसेंबर २०२६ : करायला गेलो एक आणि… (लेखक व दिग्दर्शक: धनवंत कासेकर – जय हनुमान विश्वस्त संस्था, रत्नागिरी)
मंगळवार, ८ डिसेंबर २०२६ : फक्त एकदा वळून बघ (लेखक: रविंद्र वाडकर, दिग्दर्शक: संदेश तोडणकर – करडे वाडी क्रीडा मंडळ, मुंबई मैत्री, रत्नागिरी)
बुधवार, ९ डिसेंबर २०२६ : तिचे संदर्भ नसलेली गोष्ट (लेखक: डॉ. प्रमोद खाडिलकर, दिग्दर्शक: स्वप्नील धनावडे – आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी)
नाट्यप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन :
रत्नागिरीतील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी आणि दर्जेदार नाटकांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Hotel star caters