Lote Jewellers Fraud Case: बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची दोन लाखांच्या दागिन्यांची फसवणूक; दोन भामट्यांचा हात

Lote Jewellers Fraud Case: बनावट नोटांचे बंडल देऊन सराफाची दोन लाखांच्या दागिन्यांची फसवणूक; दोन भामट्यांचा हात

लोटेतील ‘सोनल ज्वेलर्स’मधील घटना; नंबर प्लेट नसलेली गाडी आणि सीसीटीव्ही अभावी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

Lote Jewellers Fraud Case बाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथे दोन भामट्यांनी बनावट नोटांचे बंडल देऊन एका सराफाची तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (९ नोव्हेंबर) दुपारी घडली. तीन लाख रुपये असल्याचे भासवून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांची बंडले दुकानात ठेवत दोन सोन्याच्या चेन घेऊन संशयितांनी पोबारा केला. पैसे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर सराफाला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आदावडे (रा. सोनगाव-माठवाडी, खेड) यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत लोटे घाणेखुंट बसथांब्याशेजारी ‘सोनल ज्वेलर्स’ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास दोन तरुण दुकानात आले व त्यांनी दोन सोन्याच्या चेन घेण्याचे सांगून दागिने पाहण्यास सुरुवात केली. आदावडे यांनी दाखवलेल्या चेनपैकी एक चेन मित्राला दाखवून येतो, असे सांगून एक तरुण बाहेर गेला व काही वेळाने पुन्हा परतला. त्यानंतर त्याच्यासोबत आणखी एक तरुण आला.

Lote Jewellers Fraud Case: विश्वासात घेऊन लांबवले दागिने
दोघांनी दोन चेन घेण्याचे सांगून कॅरीबॅगमधून पाचशे रुपयांच्या सहा बंडलांचा गठ्ठा काउंटरवर ठेवला. "हे तीन लाख रुपये आहेत, तुम्ही पैसे इथेच ठेवा, मी मित्राला चेन दाखवून येतो," असे सांगून त्यांनी आदावडे यांचा विश्वास संपादन केला.

Pednekar sankul

या दरम्यान आदावडे यांचा भाचा दुकानाच्या दरवाजाजवळ उभा राहून संशयितांवर लक्ष ठेवून होता. मात्र, दोन्ही तरुण महामार्गावर उभी केलेल्या चारचाकी गाडीत बसून मुंबईच्या दिशेने पसार झाले. भाच्याने गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे वाहनाचा क्रमांक मिळू शकला नाही. काही वेळाने काउंटरवर ठेवलेल्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आल्यावर आदावडे यांनी लोटे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

तपासात सीसीटीव्ही व नंबर प्लेटचा अडथळा
महामार्गालगत असलेल्या सोनल ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण झाला आहे.

ज्या कॉम्प्लेक्समध्ये दुकान आहे, तेथे सीसीटीव्ही बसवलेले आहेत; मात्र त्यामध्ये कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे.

गाडीला नंबर प्लेट नसणे आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसणे यामुळे संशयितांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.