Guhagar ST Depot Mismanagement: गुहागर एसटी आगारचा गलथान कारभार; प्रवाशांची हेळसांड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त

Guhagar ST Depot Mismanagement: गुहागर एसटी आगारचा गलथान कारभार; प्रवाशांची हेळसांड होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त

सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय; चिवेली फाट्यावरील अपघातानंतर चालकांवर व वाहकांवर कारवाईची मागणी

Guhagar ST Depot Mismanagement बाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर आगारचा कारभार अत्यंत गलथान सुरू असून, ऐन दिवाळीच्या सणात प्रवाशांना योग्य सेवा मिळत नसल्याबद्दल कोकण प्रवासी ग्रामीण विभाग महासंघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) प्रदेश सरचिटणीस अनिलकुमार जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजल्यानंतर थेट ६:३० वाजेपर्यंत बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. चिपळूण-गुहागर मार्गावरील सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या चिपळूण-शृंगारतळी बसमध्ये ७० ते ८० प्रवाशांना प्रचंड गर्दीत प्रवास करावा लागला. बसमध्ये प्रवाशांच्या तक्रारी किंवा म्हणणे ऐकून घेतले जात नसून वाहक व चालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Guhagar ST Depot Mismanagement: महिलेच्या अपघातानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वी चिवेली फाटा येथे गुहागर बसमधून उतरत असताना एका महिलेचा पदर अडकून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत तिच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ती महिला गंभीर जखमी झाली आहे. अशा घटनांमुळे गुहागर आगारामधील चालक व वाहकांनी प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेऊन जबाबदारीने बस चालवणे गरजेचे असल्याचे मत अनिलकुमार जोशी यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन एसटी सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Pednekar sankul