ॲड. दीपक पटवर्धन यांचा ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ ने होणार गौरव; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सन्मान

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲड. दीपक पटवर्धन यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष श्री. आमदार प्रवीण दरेकर यांनी केले आहे.


सहकार चळवळीच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान, प्रभावी नेतृत्व, समर्पित कार्य आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पुरस्कार निवड समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
हा पुरस्कार शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


सहकार क्षेत्रातील योगदानाची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जात असून, ॲड. दीपक पटवर्धन यांच्या पुरस्कार निवडीमुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 04-07-2026