२९ सप्टेंबर रोजी शासकीय रक्तपेढीत शिबिर; समाजोपयोगी उपक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे आणि प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक सौरभ मलुष्टे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे हे दोन्ही लोकप्रतिनिधी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. आपला वाढदिवस देखील विधायक कार्यात सत्कारणी लागावा या उदात्त हेतूने त्यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त विधायक उपक्रमाचा संकल्प :
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा वाढदिवस २९ सप्टेंबर २०२६ रोजी तर नगरसेवक सौरभ मलुष्टे यांचा वाढदिवस १ ऑक्टोबर २०२६ रोजी आहे. कोणतीही अनावश्यक उधळपट्टी न करता आपल्या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक बांधिलकीतून साधण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे.

२९ सप्टेंबर रोजी शासकीय रक्तपेढीत शिबिर :
या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. हे शिबिर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय परिसरातील शासकीय रक्तपेढीत आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी नागरिकांना आवाहन व संपर्क :
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी या शिबिरात नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सुनील बेंडखळे (मोबा. ९०२८४७८३४४) यांच्याशी संपर्क साधावा.













