Chala Januya Nadila Chiplun: जागतिक नदी दिन आणि पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Chala Januya Nadila Chiplun: जागतिक नदी दिन आणि पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबरला विशेष कार्यक्रमाचे आयोजन

चला जाणू या नदीला चिपळूण व जल साक्षरता अभियानांतर्गत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रंगणार कार्यक्रम; पर्यावरण संवर्धन व रोजगारावर होणार विचारमंथन

चिपळूण : महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा उपविभाग (चिपळूण) तसेच अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्ग मित्र आणि सेवा साधना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी ‘जल साक्षरता’ व ‘चला जाणू या नदीला’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक नदी दिन आणि जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी १० वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.

नद्यांचे पुनरुज्जीवन आणि ‘जंगल नाही, नद्या नाहीत’ ही संकल्पना
नद्यांचे संवर्धन, जलप्रदूषण रोखणे, नदीपात्रातील कचरा व अतिक्रमणाला आळा घालणे तसेच नद्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत व्यापक जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या जागतिक नदी दिनाची मुख्य संकल्पना ‘जंगल नाही, नद्या नाहीत, पाणी नाही, जीवन नाही’ अशी ठेवण्यात आली असून, त्याद्वारे जंगल, नदी, जलस्रोत आणि मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

शाश्वत पर्यटन, एआय (AI) तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी
जागतिक पर्यटन दिनानिमित्त शाश्वत पर्यटन, स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी आणि पर्यटनातील डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या भूमिकेवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. ग्रामीण भागातील युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखून गावातच सेंद्रिय शेती, निसर्ग, जलसंधारण आणि पर्यटन क्षेत्राद्वारे व्यवसायाच्या संधी कशा निर्माण करता येतील, यावर विशेष विचारमंथन केले जाईल.

Shanti 4

विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि सांस्कृतिक सादरीकरण
पर्यावरण संवर्धनात युवा पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याने चिपळूण शहर व परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील महाविद्यालयांचा समावेश आहे:

सह्याद्री शिक्षण संस्थेचे सती महाविद्यालय

डी. बी. जे. महाविद्यालय

गुरुकुल

आनंदराव पवार महाविद्यालय

ए. ई. काळसेकर महाविद्यालय

नॅशनल कॉलेज, मिरजोळी

रिगल कॉलेज, कोंढे

आर. सी. कॉलेज, पेढे-परशुराम

सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालय

एस.पी.एम. कॉलेज

विद्यार्थ्यांकडून निसर्ग, नदी, कृषी व पक्षिनिरीक्षण या विषयांवर पथनाट्य, नाटिका, प्रहसन, समूहगीत, वक्तृत्व आणि भारूड सादर केले जाणार आहे. तसेच परिसरातील यशस्वी पर्यावरणपूरक उद्योजकांच्या यशोगाथाही ऐकायला मिळतील.

निसर्गप्रेमी व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या जनजागृतीपर उपक्रमात निसर्गप्रेमी, सामाजिक व शैक्षणिक संस्था, युवा मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शाहनवाज शाह (९८२२८२०३९५) आणि समीर कोवळे (८८८८०६३३५registers/८८८८०६३३५७) यांच्याशी संपर्क साधावा.