रत्नागिरी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी कॅम्पस प्रशिक्षण केंद्राचे आज उद्घाटन

रत्नागिरी : जेम्स अॅण्ड ज्वेलरी काऊंसिल व उद्योग विभाग यांनी स्थापित केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अॅण्ड ज्वेलरी कॅम्पस प्रशिक्षण केंद्राचे मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता हा उद्घाटन सोहळा होणार आहे. यामध्ये जेम्स अॅण्ड ज्वेलरी प्रशिक्षण केंद्राचे कार्य, प्रशिक्षण सुरू व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील रोजगार संबंधित उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी, या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनी, इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 24/Sep/2024