Breaking: Dharmendra Pradhan Resigns: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा!

विद्यार्थ्यांच्या जंतर-मंतरवरील आंदोलनाला अखेर यश; ३५ दिवसांच्या संघर्षानंतर शिक्षणमंत्र्यांचे पदत्याग

Dharmendra Pradhan Resigns: गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET Paper Leak आणि परीक्षेतील घोटाळ्यांविरोधात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या मोठ्या आंदोलनानंतर किंवा घोटाळ्याच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे.

Dharmendra Pradhan Resigns: “देशातील तरुणांचे भविष्य धोक्यात येऊ नये” — धर्मेंद्र प्रधान

आपला राजीनामा सादर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली. “गेल्या चार दशकांपासून मी शिक्षण क्षेत्राशी जोडलेला आहे. देशातील विद्यार्थ्यांचे आणि गुणवंत तरुणांचे भविष्य कोणत्याही राजकीय किंवा कायदेशीर वादात अडकू नये आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी याचा गैरफायदा घेऊ नये, म्हणून मी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

आंदोलनाची व्याप्ती वाढल्याने केंद्र सरकारवर प्रचंड दबाव

कॉक्रोच जनता पार्टी आणि जंतर-मंतरवर ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कोणतीही तडजोड करणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता.

  • आंदोलनाचा देशभर प्रसार: जंतर-मंतरवरून सुरू झालेला हा लढा केवळ दिल्लीपुरता मर्यादित न राहता मुंबई, राजस्थान, बिहार आणि गुवाहाटीसह देशभरात पसरला.
  • देशव्यापी असंतोष: बिहारमधील जाळपोळ आणि जंतर-मंतरवरील पोलीस कारवाईनंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता.
  • सकारात्मक चर्चा आणि राजीनामा: सरकार आणि आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये पार पडलेल्या बैठकांनंतर अखेर केंद्र सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 25-07-2026