Dharmendra Pradhan Resigns: “हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या लोकशाहीचा विजय”; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया

सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून शेअर केला ‘व्हिक्टरी’ फोटो; सीजेपी आणि ‘Gen Z’ विद्यार्थ्यांचे मानले आभार

Dharmendra Pradhan Resigns: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा लोकशाहीचा आणि थेट रस्त्यावरून उमटलेल्या जनआवाजचा मोठा विजय आहे,” असे प्रतिपादन वांगचुक यांनी केले आहे.

Dharmendra Pradhan Resigns: रुग्णालयातून व्हिक्टरी सिम्बॉल दाखवत केले ट्विट

दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते हाताने विजयाचे (Victory) चिन्ह दाखवताना दिसत आहेत.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “हा थेट रस्त्यावरून उमटलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज सर्वांत महत्त्वाचा असतो आणि जेव्हा नागरिक शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडतात, तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.”

CJP आणि ‘Gen Z’ विद्यार्थ्यांचे मानले आभार

सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि देशभरातील ‘Gen Z’ विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. “आंदोलकांनी सातत्याने आपल्या हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी ठामपणे आवाज उठवला. न घाबरता या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या देशभरातील प्रत्येक नागरिकाचे आभार,” असे ते म्हणाले.

“राजीनामा ही तर पहिली पायरी; शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची गरज”

आपल्या संदेशाच्या शेवटी वांगचुक यांनी स्पष्ट केले की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा केवळ पहिला टप्पा आहे. आता सरकारने केवळ जबाबदारी निश्चित करण्याच्या पुढे जाऊन परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे करणे आणि विद्यार्थ्यांचा ढासळलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस शैक्षणिक सुधारणा लागू करणे अत्यंत आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 25-07-2026