IRCTC New Beta Website Launch: IRCTC च्या नव्या बिटा (Beta) वेबसाईटवर आता ई-मेल, मोबाईलसह आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य; तात्काळ तिकीट बुकिंग होणार सोपे!

युजर फ्रेंडली डिझाईन आणि उच्च सायबर सुरक्षेसह भारतीय रेल्वेची नवी वेबसाईट चाचणीसाठी दाखल

नवी दिल्ली:

भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या नव्या संकेतस्थळाचे ‘बिटा व्हर्जन’ (Beta Version) लाँच केले आहे. या नवीन वेबसाईटचे डिझाईन, इंटरफेस आणि फीचर्स पूर्णपणे अपडेट करण्यात आले असून, सध्या हे पोर्टल चाचणीसाठी (Testing) खुले करण्यात आले आहे. या नव्या वेबसाईटवरून प्रवासी रेग्युलर तिकीटांसोबतच ‘तात्काळ’ तिकीटही सहजपणे बुक करू शकणार आहेत.

युजर्सना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी यासाठी अनेक सेक्शन्स एकत्र (Integrate) करण्यात आले आहेत. तसेच, या नव्या बिटा वेबसाईटवर नेव्हीगेशन सोपे करण्यात आले असून सायबर सुरक्षेतही (Cyber Security) मोठे बदल करण्यात आले आहेत.

लॉग-इन केल्यानंतर सर्वात आधी करावे लागेल हे काम:

नव्या बिटा वेबसाईटवरून कोणतेही तिकीट बुक करण्यासाठी ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रोफाईल व्हेरिफाय करण्याची सोपी पद्धत:

  1. IRCTC च्या नव्या बिटा वेबसाईटवर लॉग-इन करा.
  2. उजव्या बाजूला दिलेल्या User ID / Profile पर्यायावर क्लिक करा.
  3. ‘My Profile’ मध्ये जाऊन ‘Authenticate User’ या पर्यायाची निवड करा.
  4. येथे तुमचे आधार ऑथेंटिकेट (Authenticate) झाले आहे की नाही ते दिसेल.

तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार ऑथेंटिकेशन अनिवार्य

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांनुसार, आधार ऑथेंटिकेशन (Aadhaar Authentication) केल्याशिवाय युजर्सना त्यांच्या IRCTC अकाऊंटवरून तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही. ज्या युजर्सचे अकाऊंट आधारशी आधीच लिंक आहे, ते सहजरीत्या तात्काळ तिकीट बुक करू शकतील.

अकाऊंट आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया:

  • नव्या वेबसाईटवर लॉग-इन करून User ID वर क्लिक करा.
  • My Profile मध्ये जाऊन Authenticate User निवडा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा.
  • ऑथेंटिकेशन पूर्ण होताच तुम्ही नव्या वेबसाईटवरून तात्काळ तिकीट बुकिंग सुरू करू शकता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:11 07-08-2026