Rajapur Crime: राजापुरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धुंद आढळल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

पाचल बाजारपेठ परिसरात पोलिसांची धडक कारवाई; महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद


Rajapur Crime News: राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील सरकारी मान्यताप्राप्त देशी दारू दुकानाच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० ते ६ या वेळेत राजापूर पोलिसांनी पाचल परिसरात ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील प्रताप घाटगे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश विष्णू नाईक (वय ५२, रा. मण्णूर, ता. देवगड; सध्या रा. पाचल, राजापूर), शिवराज श्रीकांत जानकरे (वय ३४, रा. गणेशपूर, देवगड; सध्या रा. पाचल) आणि गोविंद वामन खाडे (वय ३९, रा. रायपाटन-खाडेवाडी, ता. राजापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

हे तिघेही पाचल येथील देशी दारू दुकानाजवळ सार्वजनिक रस्त्यावर दारूचे सेवन करून धुंद अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन आणि मद्यप्राशन केल्याप्रकरणी या तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान तिन्ही प्रकरणांत कोणताही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नसून तो निरंक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 10-08-2026