Lanja Development: लांजातील विकासकामांबाबत आमदार किरण सामंतांची आढावा बैठक; तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

विविध प्रशासकीय विभागांच्या कामांचा सखोल आढावा; कामांना गती देण्याचे अधिकाऱ्यांना सूचना


Lanja Development News: लांजा तालुक्यात सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या आढावा बैठकीला लांजा तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास, जलजीवन मिशन, दरडप्रवण क्षेत्र, खारभूमी, पर्यटन स्थळे, स्मशानभूमी, बंधारे, संरक्षक भिंत, धूपप्रतिबंधात्मक बंधारे, ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, सिंचन, महसूल आणि नगर पंचायत यांसह इतर महत्त्वाच्या विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे, प्रलंबित प्रस्ताव, उपलब्ध निधी, कामांची सद्यस्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारी व अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील रस्ते, पूल, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शैक्षणिक सुविधा, आरोग्य केंद्रे, अंगणवाडी इमारती, ग्रामपंचायत कार्यालये, पर्यटन विकास, शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कार्यवाही व उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किरण सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 10-08-2026