JSW Foundation, रेड क्रॉस सोसायटी आणि जयगड मत्स्य व्यवसाय संस्थेचा संयुक्त उपक्रम
जयगड येथे ओ. पी. जिंदल यांच्या जयंतीनिमित्त JSW Foundation, रेड क्रॉस सोसायटी आणि जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिक मच्छीमार बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत २३ जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कष्टकरी मच्छीमार बांधवांचा सामाजिक उपक्रमात पुढाकार
कष्टकरी मच्छीमार बांधवांनी गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत या सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून मच्छीमार समाजाने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी जयगड क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते:
- श्री. रिजवान रियाज वाडकर (चेअरमन, जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था)
- श्री. नितीन विश्वनाथ पवार (उपचेअरमन)
- संचालक मंडळ: नासीर मखजनकर, मुस्तकीम नेवरेकर, समीर बुनयाद मुजावर, जुनेद होडेकर
- इतर मान्यवर: सौ. फरजाना डांगे (माजी सरपंच), शराफत गडबडे, कबीर सोलकर, आय्युब सोलकर आदी.
रक्तदान करणाऱ्या सर्व २३ मच्छीमार बांधवांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानण्यात आले.














