१२ ते १४ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यासाठी ‘ग्रीन अलर्ट’ जारी
Ratnagiri Rain Update नुसार, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लंपडाव सुरू असून काही भागांत अधूनमधून पाऊस, तर काही ठिकाणी ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने ११ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, या कालावधीत जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६६.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून येत आहे. दिवसभरात अचानक येणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यानंतर पडणारे कडक ऊन यामुळे वातावरणातील उकाडा कमालीचा वाढला असून, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक हैराण झाले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज ११ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा असला, तरी त्यानंतर पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीसाठी जिल्ह्याला ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला आहे. या कालावधीत पाऊस विश्रांती घेईल किंवा हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:19 11-08-2026














