रस्त्याला भेगा पडल्याने प्रशासन सतर्क; आमदार किरण सामंत व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून पाहणी
रत्नागिरी:
Amba Ghat Road Damage News बाबत समोर आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी-कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गावरील आंबा घाटात जमीन खचल्याने रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या घाटातून फक्त अवजड वाहनांची (Heavy Vehicles) वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, चारचाकी वाहने आणि एसटी बसेसची (MSRTC) वाहतूक सुरक्षितरीत्या सुरू ठेवण्यात आली आहे.
पावसाचा जोर सध्या काहीसा कमी झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून लवकरच रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या पाहणीनंतरच एसटी वाहतुकीबाबतचा पुढील महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.
Amba Ghat Road Damage News: आमदार किरण सामंत व जिल्हाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
काही दिवसांपूर्वी आंबा घाटातील दोन दऱ्यांना जोडणाऱ्या संवेदनशील भागात रस्त्याला अचानक मोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून आमदार किरण (भैया) सामंत यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली होती व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरक्षेबाबत सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि पोलीस अधीक्षक यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. घाटातील वाहतूक आणि रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांनी आणि वाहनचालकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:27 11-08-2026














