Ratnagiri Saturday Market Shopping Center: शनिवार आठवडा बाजारातील नवीन शॉपिंग सेंटरसाठी ७ कोटींच्या निधीला मंजुरी; पण कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा

धोकादायक इमारतीवरून गाळेधारक न्यायालयात; नगर परिषदेकडून बांधकामाची पूर्वतयारी पूर्ण

रत्नागिरी:

Ratnagiri Saturday Market Shopping Center बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध शनिवार आठवडा बाजार येथील नवीन भव्य शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जुन्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांनी न्यायालयात दाखल केलेला दावा प्रलंबित असल्याने, या नव्या इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी आता न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शनिवार बाजारातील जुनी इमारत अत्यंत धोकादायक झाली होती. नागरिकांची सुरक्षा आणि संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने काही वर्षांपूर्वी सर्व गाळेधारकांना गाळे रिकामे करून इमारत नगर परिषदेच्या ताब्यात देण्याबाबत कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात जुन्या गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे नवीन शॉपिंग सेंटरच्या उभारणीचा मार्ग अडकला आहे.

Ratnagiri Saturday Market Shopping Center: वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी; निकालाकडे लक्ष

सदर प्रस्तावित शॉपिंग सेंटरचे बांधकाम हे राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’तून मिळालेल्या विशेष निधीतून केले जाणार आहे. भविष्यात न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये, यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने प्रशासकीय पातळीवर सर्व पूर्वतयारी आधीच पूर्ण केली आहे. त्यानुसार ७ कोटी रुपयांच्या निधीच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेची मंजुरीही घेऊन ठेवण्यात आली आहे.

न्यायालयाचा निकाल लागताच या आधुनिक आणि सुविधांयुक्त शॉपिंग सेंटरच्या प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा होईल आणि कामाला तात्काळ गती मिळेल, अशी अपेक्षा नगर परिषद प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 11-08-2026