हायवेच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त; तातडीने उपाययोजना करण्याचे इंजिनिअरना आदेश
रत्नागिरी:
Ratnagiri Ward 1 Drainage News बाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर परिसरात हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवाशांची चिंता वाढली आहे. या कामामुळे पावसाळ्यात सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या समस्येची गांभीर्याने दखल घेत प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.
Ratnagiri Ward 1 Drainage News: इंजिनिअर व स्थानिकांसोबत चर्चा; तातडीने उपाययोजनांचे निर्देश
पाहणीदरम्यान नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी संबंधित महामार्गाचे इंजिनिअर आणि परिसरातील स्थानिक नागरिकांसमवेत सविस्तर चर्चा केली. महामार्गाच्या भरावामुळे आणि योग्य पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरण्याची शक्यता स्थानिकांनी बोलून दाखवली.
यावर तोडगा काढत, “पावसाचे पाणी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या घरात शिरून नुकसान होणार नाही, यासाठी इंजिनिअर्सनी तातडीने पाण्याचा निचरा करणारी पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात,” अशा कडक सूचना वैभवी खेडेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 11-08-2026














