पोलिसांनी वाहन घेतले ताब्यात
संगमेश्वर:
Sangameshwar Traffic News बाबत मिळालेल्या वृत्तानुसार, सार्वजनिक रस्त्यावर नागरिक व इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशा बेजबाबदार पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एका चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाच्या पुलाखाली करण्यात आली. या ठिकाणी एक वाहन अत्यंत धोकादायक स्थितीत उभे करून रहदारीस अडथळा निर्माण करण्यात आला होता.
Sangameshwar Traffic News: चिपळूणमधील चालकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी चालक सुनील दत्तात्रय कुंभार (वय ४५, रा. दहीवली खुर्द, ता. चिपळूण) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संगमेश्वर पोलिसांनी संबंधित वाहन ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 11-08-2026














