Pangari Tarfe Haveli Fast Protest: पांगारी तर्फे हवेली रस्ता अतिक्रमणाविरोधात १५ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण; गुहागर तहसीलदारांना निवेदन

सडेवाडी भुरुकुंडा रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाईची मागणी; प्रशासन न्यायाची दखल घेत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गुहागर शहर:

Pangari Tarfe Haveli Fast Protest बाबत मिळालेल्या वृत्तानुसार, गुहागर तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली येथील ग्रामस्थांनी रस्ता अतिक्रमणाच्या विरोधात आणि न्यायाच्या मागणीसाठी येत्या १५ ऑगस्टपासून सकाळी ८ वाजल्यापासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही योग्य न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत पांगारी तर्फे हवेली येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला अधिकृत निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, पांगारी तर्फे हवेली येथील सडेवाडी भुरुकुंडा हा ग्रामीण मार्ग पूर्वी ग्रामनिधीतून जमीन मालकांच्या सहमतीने तयार करण्यात आला होता.

Pangari Tarfe Haveli Fast Protest: निधी खर्चूनही रस्ता जेसीबीने खोदल्याचा आरोप
त्यानंतरच्या काळात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा शासकीय निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, संबंधित रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आले असून, तो रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Tata altroz

सार्वजनिक वापराच्या रस्त्यावर झालेले हे अतिक्रमण हटवून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी गुहागर तहसील कार्यालयासमोर आमरण बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 11-08-2026