कोलकाता हायकोर्टाच्या निर्देशानंतर दमदम येथून हुगळी पोलिसांची कारवाई; भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
कोलकाता:
Abishek Porel Arrested News मुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा आणि बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल (Abishek Porel) याला एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार, मारहाण आणि धमकावल्याच्या आरोपाखाली पोलिसांकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दमदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामी सिटी येथून हुगळी पोलिसांनी अभिषेक पोरेलला ताब्यात घेतले.
Abishek Porel Arrested News: ३ वर्षांचे नाते अन् लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
हुगळीचे पोलीस अधीक्षक कुंवर भूषण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वैद्यकीय विद्यार्थिनीने जून महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
- लग्नाचे आमिष: तक्रारदार महिलेच्या मते, ती आणि अभिषेक गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकने लग्न करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले.
- मारहाण व धमकी: गेल्या वर्षापासून त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले. त्यानंतर पोरेलने तिच्यापासून दुरावा निर्माण केला, तिला मारहाण केली तसेच गंभीर धमक्या दिल्याचा आरोपही महिलेने केला आहे.
हायकोर्टाच्या निर्देशानंतर कारवाई; BNS आणि IT Act च्या गंभीर कलमांखाली गुन्हा
या प्रकरणी कलकत्ता हायकोर्टाने पोलिसांना अभिषेक पोरेलला अटक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरेलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१), ६६, ६९, ७४, ७५(२), ७९, ११५(२), ११७(२), १२४(१), १२७(२), १०९, ३०८(२), ३५१(२), ३५१(३), ३१६(२), ३१८(३), ६१(२) आणि ३(५) यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) कलम ६६E आणि ७२ अंतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा फलंदाज
अभिषेक पोरेल हा डाव्या हाताचा फलंदाज असून तो २०२३ पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळत आहे. त्याने भारत ‘A’ संघाकडून खेळताना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौराही केला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरेलने ३२ प्रथम श्रेणी आणि २३ लिस्ट-ए सामने खेळले आहेत.
दरम्यान, अभिषेक पोरेलने यापूर्वी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले होते. त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेत या आरोपांची काय सत्यता समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 11-08-2026













