उपक्रमाला पालकमंत्री उदय सामंत साहेब, आमदार किरण शेठ सामंत, नगराध्यक्ष शिल्पा ताई सुर्वे, शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित,बिपीन बंदरकर व बंड्या शेठ साळवी व सर्व पदाधिकारी यांचे लाभले मार्गदर्शन
रत्नागिरी : एस.टी. महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगरसेवक सौरभ सुरेश मलुष्टे यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक ५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय NCMC कार्ड नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कॅम्पमध्ये तीन दिवसांत तब्बल ४५० ते ५०० महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कार्डची नोंदणी करून घेतली.
वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन अन् परिसरातील नागरिकांची सोय
या सामाजिक उपक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण (भैय्या) सामंत, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, तसेच शिवसेना पदाधिकारी राहुल पंडित, बिपीन बंदरकर, बंड्या साळवी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नागरिकांना NCMC कार्ड नोंदणीसाठी लांब जावे लागू नये आणि शासनाच्या प्रवास सवलतींचा लाभ सहज मिळवून देता यावा, यासाठी प्रभागातच ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. स्वतःच्या परिसरातच पारदर्शक पद्धतीने नोंदणी झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि आयोजकांचे आभार मानत उपक्रमाचे कौतुक केले.
आयोजक आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य
कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी ‘सौरभ मलुष्टे मित्र मंडळाचे’ सदस्य तसेच कार्यकर्ते – चिनार आचरेकर, शिवराज पाटील, अभिषेक सुर्वे, दिनेश जठार, चिनार प्रसादे, योगेश विरकर, तृप्ती विरकर, तेजल पाटील, सुनील बेंडखळे, राजा बामणे, अविनाश भोसले, सुरज सावंत, दीपक मेस्त्री आणि प्रेमराज फोडकर यांनी परिश्रम घेतले.
याशिवाय, समृद्धी सर्व्हिसेसचे संदीप चव्हाण व स्नेहा चव्हाण यांनी कॅम्पच्या तांत्रिक आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
नगरसेवक सौरभ मलुष्टे यांची प्रतिक्रिया:
“प्रभागातील नागरिकांना शासकीय योजना व सुविधांचा लाभ सहज आणि त्यांच्या स्वतःच्या परिसरातच मिळावा, या उद्देशाने अशा प्रकारचे जनहितोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा माझा मानस आणि प्रयत्न राहील.”













